पावसाची गंमत

अलेक पदमसींच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली.
ही नंतर ’आतल्यासहित माणूस’ मधे वापरली होती.
-----------------------------------------
तिची एक छोटीशी गंमत आहे.
तिने स्वत:च गुंफलेली,
स्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली.
पाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते,
आजूबाजूच्या भिंती
अलगद विरघळून जातात,
सगळेच आकार धुसर होतात,
तिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो,
हळू हळू पाऊसच होत जातो,
शेवटी तीही विरघळून जाते,
पावसाच्या थेंबासारखी,
अम्लान, अनावृत.
अश्या तिच्या स्वप्नात
तिची तंद्री लागून राहते,
आणि मग कधी कधी
खरंच ती पाऊस होते.
- नी

Comments

Popular posts from this blog

स्थलांतर २

जग!

क्रिएटिविटीच्या भुता...