अदृश्य!

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती
---------------------------------------
फुलांच्या पायघड्यांवरून
त्याचा हात धरुन ती जात असते.
त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते.
पावले थिरकायला लागतात,
त्याच्या तालाशी जुळायला लागतात.
ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते
स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते.
कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते
ती अजूनच खूश होते, हसते.
कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते
हादरते, ती अदॄश्यच असते.

अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं.
अगदी आत आत पर्यंत.
'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?'
डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते
याच आकाशाने तिला नेहमी हात पसरून ये म्हटलेलं असतं.
आज ते आकाशच तिला दिसत नाहि.
वर पहाता नजरेत न मावणारा तो असतो.
नि तिच्यावर त्याची सावली पडलेली असते.

- नी

Comments

Popular posts from this blog

क्रिएटिविटीच्या भुता...

स्थलांतर २

जग!