दुखरा फोड

जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती.
----------------------------------------------------
दुखरा फोड फुटून जाताना
क्षणिक तीव‘ कळ जाते.
सगळा प्राण गळ्यात अडकतो,
डोळ्यापुढून आयुष्य सरकते...

हुश्श!!!...

पुढचा क्षण घेऊन येतो
एक सुटकेचा नि:श्वास,
किंचित बधीरलेला मेंदू
आणि खूपसा सैलावलेपणा.

असं नेहमीच होतं...
आयुष्य कापताना...

पण हा सैलावलेपणा टिकत नाही...
पुन्हा त्याच वर्तुळात फिरणे संपत नाही..

अगदी आभाळालाही हे चुकल नसावं..
दरवर्षी पावसानंतर
ते असच सैल नी मोकळं दिसत रहातं
पुढचा पाऊस लागेपर्यंत

-  नी

Comments

Popular posts from this blog

क्रिएटिविटीच्या भुता...

स्थलांतर २

जग!