क्षण क्षण!
जुनीच कविता. २००६ मधे 'आतल्यासहित माणूस' हा कवितांचा
नाट्याविष्कार असा प्रयोग मी दिग्दर्शित केला होता. मायबोलीवर मला
भेटलेल्या काही कवींच्या(बेटी, हेम्स, परागकण, पेशवा, शुमा, क्षिप्रा,
गिरीराज, दिपक) आणि माझ्याही काही कवितांचा समावेश या प्रयोगात होता. २००५
मधे लिहिलेली ही खालची माझी कविता या प्रयोगात वापरली होती.
---------------------------------------------------------------------------------
क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून
मातीत मिळतो.
शोधू पहाता सापडत नाही.
खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
सोन्याच्या अक्षरांची.
एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
बाकीचे लिहितात
तुमच्या आमच्या करंटेपणाचे
वांझोटे आलेख.
लागत असतील का
त्या दुर्दैवी क्षणांचे शाप
तुमच्या आमच्या कर्तृत्वाला?
उत्तर हो च धरूया,
शाप, दैव या भोवर्यातच
तुमचा आमचा नाकर्तेपणा
जन्म घेत असतो.
- नी
---------------------------------------------------------------------------------
क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून
मातीत मिळतो.
शोधू पहाता सापडत नाही.
खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
सोन्याच्या अक्षरांची.
एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
बाकीचे लिहितात
तुमच्या आमच्या करंटेपणाचे
वांझोटे आलेख.
लागत असतील का
त्या दुर्दैवी क्षणांचे शाप
तुमच्या आमच्या कर्तृत्वाला?
उत्तर हो च धरूया,
शाप, दैव या भोवर्यातच
तुमचा आमचा नाकर्तेपणा
जन्म घेत असतो.
- नी
Comments
Post a Comment