Posts

Showing posts from May, 2011

वादळवेडी

आतल्यासहित माणूस या प्रयोगात ही कविता होती. पेशव्याची 'प्रिय' ही कविता आणि माझी 'वादळवेडी' अश्या दोन्ही कविता एकत्र गुंफून तो बीट तयार केला होता. 'प्रिय' ने सुरूवात व्हायची मग 'वादळवेडी'चा पहिला भाग मग परत 'प्रिय' चा उरलेला भाग आणि 'वादळवेडी'च्या पुढच्या भागाने शेवट. रंगमंचावर १० एक मीटरचं गुलबक्षी रंगावर सोनेरी अक्षरं असलेलं पत्र अनफोल्ड होत जायचं आणि दुसर्‍या विंगेत ते विरून जायचं. प्रयोगातल्या माझ्या लाडक्या बिटस पैकी हा एक होता. अंबरीष देशपांडे, मयूर हरदास आणि राजेश्वरी वैद्य करायचे पण मस्त. http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan इथे वरून दुसर्‍या ओळीतले डावीकडचे दोन फोटो. पहिला आहे तो प्रिय कवितेचा दुसरा भाग/ शेवट आणि दुसरा आहे तो वादळवेडीचा शेवट. ------------------------------------------------------------- तिला सुसाट वार्‍याचं वेड होतं वेळीअवेळी बांबुच्या बनातुन वारा घुमायचा, अन् तिच्या पोटातुन चंद्र आडवा उभा सरकायचा. भारल्यासारखी ती बाहेर पडायची, पिसाटल्यासारखी काहितरी शोधत रहायची "कन्या