Posts

Showing posts from 2010

गंमतीची गोष्ट

मी लिहायचं तुम्ही नावाजायचं मी आनंदायचं परत लिहायचं हा आपलातुपला गंमतनाच! नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा. लिहिण्याचा हात धरून पळून गेली. खूप विनवलं तिला थांब म्हणून. पण ऐकेना. तिचं टुमणं एकच आळस सोड कष्ट कर कसं जमावं? जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला! पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड. 'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं कल्पना तरी कशी करू शकतेस तू?' गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!! गेलीच निघून आता मी नाही लिहायचं तुम्ही लिही ना म्हणायचं माझी मान वर तुम्ही परत लिही ना म्हणायचं आता माझी कॉलरच ताठ!! स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!! -इतिश्री निर्जाबाई उवाच!!

ताल कध्धी चुकतच नाय!

जळमट धूळ जिकडे तिकडे पसार्‍यात कायच सापडत नाय उनच्चुन घामच्च्घाम ताल कध्धी चुकतच नाय! काम पडलीत, धामं अडलीत लक्ष मुळी लागतच नाय उनच्चुन घामच्च्घाम ताल कध्धी चुकतच नाय! भूक नाही, झोपही नाही कंटाळ्याने पसरले पाय उनच्चुन घामच्च्घाम ताल कध्धी चुकतच नाय! रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं शून्याचा पाढा घोकत जाय उनच्चुन घामच्च्घाम ताल कध्धी चुकतच नाय! कोपरा न कोपरा लख्ख केला डोक्यामध्धे कायच नाय उनच्चुन घामच्च्घाम ताल कध्धी चुकतच नाय! -नी