बिघडलीये काच!

खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
चोरून आणलेल्या
चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!

Comments

Popular posts from this blog

स्थलांतर २

जग!

क्रिएटिविटीच्या भुता...