खुळ्या भिंगोर्‍या



चळ लागल्या झुळझुळ रेषा
त्यावरून नजर फिरवताना
मी चित्रमित्राला विचारलं
'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा
एकातएक मिसळणार्‍या
आणि एकातून एक फुटणार्‍या?
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'
उत्तरादाखल तो स्वचित्रातून
केवळ रोखून बघत राह्यला.
आणि चित्रागणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेला.
त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते
नजरेमधे ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती.
मग मला वाटत राह्यलं
आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात,
पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय..
आता त्याचं स्वचित्र
खदाखदा हसलं
पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या
....
....
मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय!

Comments

  1. अप्रतिम.. मी स्वत: व्हॅन गॉग चा चाहता आहे. मी पण त्याची चित्र अशीच न्याहाळली, अनुभवली आहेत आमच्या कॊलेजच्या ग्रंथालयात .. पण त्या वाटण्याच शब्दरूप मी आज प्रत्यक्ष वाचलं .. सुंदरच !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्थलांतर २

जग!

क्रिएटिविटीच्या भुता...