अदृश्य! २

नजरेत न मावणार्‍या त्याला बघत ती सुखावते,
त्याच्या सावलीच्या ओझ्याने उदासतेही
त्याच्या डोळ्यांचा ती वेध घेउ पहाते
स्वत:अचे हसू तिथे शोधू पहाते
त्यातच तिची नजर हरवते
तरीही पावलांचा जुळणारा ताल मात्र सुटत नाही
ती हळूहळू त्या तालातच हरवायला लागते

अचानक कुठूनतरी आभाळाचा एक चुकार तुकडा
आपली सगळी मर्यादा सोडून तिच्या पुढ्यात येतो
कशी आहेस तू? विचारतो, नी तिचा तालच बिघडतो
तिला आठवतात त्या आभाळाने घातलेल्या शपथा,
त्याला साक्षी ठेवून स्वत:अला दिलेली वचन.
त्या चतकोर आभाळाला ती जवळ घेते नि वर पहाते
परत तिला तिच जुनं आभाळ सापडतं
हात पसरून ये म्हणणारं.
नि त्याच्या डोळ्यातले तिचं हसूही.
ती त्या छोटुल्या आभाळाला कुरवाळते....
आभाळ कुठले ते, तो तर त्याचा एक अश्रू असतो.

आता त्या दोघांचा ताल पक्का आहे नि
आपलं आभाळ मात्र तीनं आता खिडकीतच ठेवलेय...
हरवू नये म्हणून...

- नी

Comments

Popular posts from this blog

क्रिएटिविटीच्या भुता...

स्थलांतर २

जग!