संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?
अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...
कविता म्हणजे खरं बोलणं. कविता म्हणजे प्रामाणिक असणं. बास इतकंच आहे या प्रवाहिकांमधे...!
11:42 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment